दिल्ली : इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्तान पेट्रोलियम या तीन तेल कंपन्यांनी विना-अनुदानित गॅल सिलिंडर अर्थात एलपीजी पाच रूपयांनी स्वस्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात भाव घसरल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं या कंपन्यांकडून सांगण्यात येतंय.
१४.२ किलो ग्रॅमचा सिलेंडर आता दिल्लीत ६१६ रूपये, मुंबईत ६२७ रूपये ५० पैसे, कोलकात्यात ६४९ रूपयांना आणि चेन्नईत ६०८ रूपये ५० पैशांना मिळणार आहे.
तसंच विमान इंधनाच्या किंमतीतही ०.५ टक्क्यांची घट करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.