'छेडछाडग्रस्त मुलीचा मृत्यू ही तर देवाची इच्छा' - पंजाबचे शिक्षणमंत्री

पंजाबमधील विनयभंग आणि हत्या प्रकरणानं वेगळं वळण घेतलंय. घटनेतील मुलीचा मृत्यू ही इश्वराची इच्छा असल्याचं वादग्रस्त वक्तव्य शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे शिक्षण मंत्री सूरजीत सिंग राखा यांनी केलंय. त्यांच्या या विधानावर पीडित कुटुबियांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. 

Updated: May 2, 2015, 02:23 PM IST
'छेडछाडग्रस्त मुलीचा मृत्यू ही तर देवाची इच्छा' - पंजाबचे शिक्षणमंत्री title=

मोगा, पंजाब: पंजाबमधील विनयभंग आणि हत्या प्रकरणानं वेगळं वळण घेतलंय. घटनेतील मुलीचा मृत्यू ही इश्वराची इच्छा असल्याचं वादग्रस्त वक्तव्य शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे शिक्षण मंत्री सूरजीत सिंग राखा यांनी केलंय. त्यांच्या या विधानावर पीडित कुटुबियांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. 

दरम्यान घटनेतील मृत मुलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय पीडित मुलीच्या नातेवाईकांनी घेतलाय. 

मुलीच्या मृत्यूसाठी ५० लाख रुपये नुकसानभरपाई, कुटुंबातील एकाला नोकरी, तिच्या आईवर मोफत उपचार आणि घटना ज्या बसमध्ये घडली ती चालवणाऱ्या 'ऑर्बिट अ‍ॅव्हिएशन'चा परवाना रद्द करणं या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असं मुलीचे वडील सुखदेव सिंग यांनी सांगितलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.