आरुषी हत्याकांड : तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा

आरुषी हत्याकांड प्रकरणात दोषी ठरलेले राजेश तलवार आणि नूपूर तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. सीबीआयच्या विशेष न्यायालयानं हा निकाल दिलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 26, 2013, 04:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आरुषी हत्याकांड प्रकरणात दोषी ठरलेले राजेश तलवार आणि नूपूर तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. सीबीआयच्या विशेष न्यायालयानं हा निकाल दिलाय.
आयपीसी कलम ३०२ नुसार राजेश तसंच नुपूर तलवार या आरुषीच्या आई-वडिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. शिक्षा सुनावणीनंतर राजेश आणि नुपूर या दोघांचीही पुन्हा डासना जेलमध्ये रवानगी करण्यात येणार आहे.

तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावताना, कलम २०३ नुसार राजेश तलवार याला एका वर्षांची शिक्षा तर कलम २०१ नुसार दोघांनाही पाच-पाच वर्षांची शिक्षा सुनावलीय. सोबतच कोर्टानं दोघांवर १०-१० हजार रुपयांचा दंडही ठोठावलाय.
आरुषीची हत्या तिच्या आई-वडिलांनीच म्हणजे तलवार दाम्पत्यानंच केल्याचं काल न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. तसंच आरुषीनंतर नोकर हेमराजचीही हत्या तलवार दाम्पत्यानं केल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं. या प्रकरणात गूढ न्यायालयाच्या कालच्या सुनावणीपर्यंत कायम होतं. अखेर गाझीयाबादच्या सीबीआय कोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर या प्रकरणावरचा पडदा उघडलाय. यामध्ये आरुषी आणि हेमराज यांची हत्या राजेश आणि नुपूर तलवार यांनीच केल्याचं न्यायालयानं दिलेल्या निर्णयात म्हटलंय.
या प्रकरणात आज दोषी तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सीबीआय कोर्टानं ठोठावलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.