9 वॅटचा एलईडी बल्ब आता फक्त 65 रुपयाला

एलईडी बल्बचा वापर वाढावा आणि वीज बचत व्हावी यासाठी केंद्रातल्या मोदी सरकारनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Updated: Dec 2, 2016, 02:01 PM IST
9 वॅटचा एलईडी बल्ब आता फक्त 65 रुपयाला  title=

नवी दिल्ली : एलईडी बल्बचा वापर वाढावा आणि वीज बचत व्हावी यासाठी केंद्रातल्या मोदी सरकारनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या उज्वला योजनेअंतर्गत मिळणारा 9 वॅटचा एलईडी बल्ब आता फक्त 65 रुपयांना मिळणार आहे. हे एलईडी बल्ब विकत घेण्यासाठी ग्राहकांना एमएसईबी ऑफिसमध्ये आत्ताचं बिल आणि आयडी प्रूफ द्यावा लागणार आहे.

550 रुपयांना मिळणाऱ्या एलईडी बल्बची किंमत 65 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. प्रत्येक राज्य सरकारचं एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड उज्वला योजनेअंतर्गत ग्राहकांना एलईडी बल्ब देतं. उज्वला योजनेमार्फत आत्तापर्यंत 17.89 कोटी एलईडी बल्बची विक्री झाली आहे.

देशात असलेले 77 कोटी बल्ब एलईडीच्या माध्यमातून बदलायचा केंद्र सरकारचा विचार आहे. यामुळे 20 हजार मेगावॅट वीजेची बचत होईल तसंच वर्षाला 40 हजार कोटी रुपयांच्या बिलाचीही बचत होणार आहे.