नवी दिल्ली / लखनऊ : राजकारणातले दोन दिग्गज आता एकमेकांशी नातं जोडताना दिसणार आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांचा नातू तेजप्रताप सिंह आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची मुलगी राजलक्ष्मी हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लालू यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी हे आज मुलायम सिंह यांच्या लखनऊ स्थित घरी ‘शगू’न घेऊन दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगी तेजस्वी, मोठी मुलगी मीसा यांच्यासहीत कुटुंबातील इतर सदस्यही होते.
मुलायम सिंग यांचा नातू तेजप्रताप सिंह यादव मैनपुरीमधून खासदार आहे. तर राजलक्ष्मी लालू यांच्या नऊ अपत्यांपैकी सर्वात लहान मुलगी आहे.
गेल्या २८ नोव्हेंबर रोजी दिल्लीत लालू आणि मुलायम यांच्य उपस्थितीत दोन्ही कुटुंबातील सदस्यांची भेटही झाली होती. त्याच दिवशी ‘शगुन’ची तारीख निश्चित झाली होती. यानंतर दिल्लीतील एका फार्म हाऊसमध्ये १६ डिसेंबर रोजी या दोघांचा साखरपुडा पार पडणार आहे. तर लग्न जानेवरी महिन्यात पार पडेल.
या संबंधांबद्दल बोलताना समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी आपले आणि लालूप्रसाद यादव यांचे वर्षानुवर्षे संबंध आहेत आणि आम्ही एकत्रच काम करत असल्याचं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.