कोलकाता : गावातीलच एका तरुणाशी आपल्या मुलीचे प्रेमसंबंध आहेत, हे कळल्यानंतर एका पित्याचा राग अनावर झाला आणि या रागाच्या भरातच त्यानं आपल्या मुलीची जीभच छाटून टाकलीय.
ही घटना घडलीय कोलकात्यातील २४ दक्षिण परगणा येथील अधरमाणिक गावात... गावातल्या तरूणाशी आपल्या मुलीचे प्रेमसंबंध आहेत असे पित्याला कळल्यानंतर त्यानं असं पाऊल उलचललंय ज्याची कधी कुणी कल्पनाही केली नव्हती.
संबंधीत नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे गावातील तरुणाशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला मुलीचे वडिल मन्सूर अली लष्कर यांचा प्रचंड विरोध होता. त्यांनी मुलीला प्रेमसंबंध बंद करण्यास सांगितले. मात्र, मुलीनं वडिलांचं म्हणणं ऐकण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या पित्याने रागाच्या भरात आपल्या मुलीची जीभच छाटलीय. त्यानंतर तीचा गळा दाबून तीला मारण्याचा प्रयत्न केला. मुलगी बेशुद्ध झाल्यावर तिला गावातल्याच शेतामध्ये फेकून दिले.
सकाळी गावातल्या लोकांनी मुलीला बेशुद्धावस्थेत पाहिले आणि तिला रुग्णालयात दाखल केले. सध्या या मुलीवर डायमंड हार्बरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिचा पिता आणि त्याचे दोघे साथीदार फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.