माजी पोलीस अधिकारी बेदींकडे ११ करोडोंची संपत्ती!

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या भाजपच्या  मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी नामांकन पत्र दाखल करताना आपली संपत्ती जाहीर केलीय. माजी पोलीस अधिकारी किरण बेदी आणि त्यांच्या पतीकडे एकूण ११.६५ करोड रुपये किंमतीची मालमत्ता आहे. 

Updated: Jan 22, 2015, 11:33 AM IST
माजी पोलीस अधिकारी बेदींकडे ११ करोडोंची संपत्ती! title=

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या भाजपच्या  मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी नामांकन पत्र दाखल करताना आपली संपत्ती जाहीर केलीय. माजी पोलीस अधिकारी किरण बेदी आणि त्यांच्या पतीकडे एकूण ११.६५ करोड रुपये किंमतीची मालमत्ता आहे. 

कृष्णानगर मतदार संघातून दिल्ली विधानसभेत निवडणुकीत उतरलेल्या किरण बेदींनी बुधवारी आपला अर्ज सादर केला. यामध्ये, आपल्याविरुद्ध कोणताही अनिर्णित खटला दाखल नाही, असंही बेदींनी म्हटलंय. 

आपल्या संपत्तीचा उल्लेख करताना आपल्याकडे ११ करोड, ४ लाख, २ हजार ६७७ रुपयांची एकूण संपत्ती असल्याचं त्यांनी म्हटलंय. यामध्ये, त्यांच्या पतीच्या ६१ लाख ३५ हजार ५२८ रुपयांच्या संपत्तीचाही समावेश आहे. 

बेदींच्या घोषणेनुसार, त्यांच्याकडे ३ करोड, १४ लाख २ हजार ६७७ रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. यामध्ये पाच ग्रॅम सोनंही आहे. त्यांच्या पतीकडे ३२ लाख ८५ हजार ५२८ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसंच त्यांच्याकडे दिल्लीमध्ये द्वारका तसंच उदय पार्क तसंच उत्तर प्रदेशच्या गौतमबुद्ध नगरमध्ये एक-एक फ्लॅट आहे. याचं एकूण मूल्य ६.५ करोड रुपये आहे. 
 
बेदींकडे मारुती ८०० कार आहे तसंच पुणे आणि गुडगावमध्ये कृषी भूखंड आहे. पुण्याची जमीन १.६० करोड रुपये तर गुडगावच्या जमीनीचं मूल्य २५ लाख रुपये आहे. किरण बेदी यांच्या पतीकडे अमृतसरमध्ये २८.५० लाख रुपयांची शेतजमीन आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.