मेरठ: उत्तर प्रदेशमध्ये खाप पंचायतचा आणखी एक वादग्रस्त फतवा पुढं आलाय. फतवा असा आहे की, यापुढे बॉलिवूडही फिकं पडेल. एका तरुणाची पत्नी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली तर पंचायतनं तरुणाला प्रियकराच्या पत्नीसोबत राहण्याचे आदेश दिले, ज्यानं तरुणाची पत्नी पळवली होती.
प्रकरण उत्तर प्रदेशच्या बाबूगढमधील एका गावातलं आहे. तरूणाचं लग्न मेरठमधील एका तरुणीसोबत झालं होतं. लग्नापासूनच दोघांचं नातं सामान्य नव्हतं. त्यांच्यात नेहमी भांडण व्हायचं. महिलेचं आपल्याच गावातील एका दुसऱ्या तरूणावर प्रेम जडलं. काही दिवसांनी दोघं गाव सोडून पळून गेले.
जेव्हा तरुणाच्या तक्रारीवर पोलिसांनी काही केलं नाही तेव्हा गावातील पंचायतीनं निर्णय दिला. पीडित तरुणाला पंचायतीनं सांगितलं की, ज्यानं तुझ्या बायकोला पळवलंय तू त्याच्या बायकोला आपल्यासोबत ठेव. पुढं पंचायतीनं हे सुद्धा म्हटलं की, पळून गेलेल्या तुझ्या पत्नीला त्याच तरूणासोबत राहू दे. शिवाय पंचांनी पीडितला 10 हजार रुपये नुकसान भरपाई मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.
दरम्यान, जिल्हा प्रशासनानं असा निर्णय देणाऱ्या पंचायतीविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.