महिला IPSने फेसबूकवर लिहिले, २९ वर्षांपासून सुरू होते शोषण

 केरळच्या एक वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारीने तीन दशकांनंतर आपल्या एका सहकाऱ्यावर शोषणाचा आरोप केला आहे. 

Updated: Feb 1, 2016, 09:10 PM IST
 महिला IPSने फेसबूकवर लिहिले, २९ वर्षांपासून सुरू होते शोषण title=

तिरूवंतपुरम :  केरळच्या एक वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारीने तीन दशकांनंतर आपल्या एका सहकाऱ्यावर शोषणाचा आरोप केला आहे. 

पोलीस अतिरिक्त महानिदेशक एस श्रीलेखा यांनी फेसबूकवर एक पोस्ट टाकली आहे.  त्यात त्यांनी सांगितले की, आयपीएस अधिकारी परिवहन नआयुक्त तोमिन जे थचंकारी यांनी प्रशिक्षण काळात २९ वर्ष शौषण केले आहे. 

या आरोपांचे आरोपींनी खंडन केले आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

परिवहन आयुक्तांनी त्यांच्या कार्यकाळात दोन स्कूल बसला खासगी बस म्हणून परिवर्तीत करण्याच्या आरोप लावण्यात आला होता. त्यानंतर श्रीलेखा यांचे हे फेसबूक पोस्ट आले. त्या आपल्या फेसबूक पोस्टर कायम आहेत. 

मी सरकार, कोर्ट आणि पोलीस विभागाविरोधात कोणतेही विधान केले नाही. मी पोस्टमध्ये जे काही बोलली आहे त्यावर कायम आहे.