मुंबई : नोटबंदीच्या निर्णयानंतरचे सगळे सीसीटीव्ही फूटेज जपून ठेवण्याचे आदेश आरबीआयनं बँकांना दिले आहेत. 8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंतचं सीसीटीव्ही फूटेज बँकांकडे असावं असं आरबीआयनं सांगितलं आहे. याबरोबरच नवीन नोटांचे रेकॉर्डही ठेवायला सांगण्यात आलं आहे.
याबरोबरच नव्या नोटांबद्दलचं रेकॉर्ड बँकेला ठेवणं, 500च्या नोटांचे सिरीयल नंबर आणि आरबीआयनं दिलेल्या चलनाची नोंद ठेवणंही बँकांना बंधनकारक करण्यात आलं आहे. दिवसाच्या शेवटी या सगळ्या रेकॉर्डवर बँक मॅनेजरला सही करावी लागणार आहे.