जुन्या नोटा बदलून देण्याचे रॅकेट, आरबीआयच्याच अधिकाऱ्याचा हात

जुन्या नोटा बदलून  देण्याच्या रॅकेटमध्ये आता थेट आरबीआयच्याच अधिकाऱ्याचा हात असल्याचं उघड झाले आहे. बंगळुरूत सीबीआयनं  या अधिकाऱ्याला तब्बल ५ कोटी ७० लाखांच्या नव्या दोन हजारांच्या नोटांसह अटक केली. 

Updated: Dec 13, 2016, 05:36 PM IST
जुन्या नोटा बदलून देण्याचे रॅकेट, आरबीआयच्याच अधिकाऱ्याचा हात  title=

बंगळुरु : जुन्या नोटा बदलून  देण्याच्या रॅकेटमध्ये आता थेट आरबीआयच्याच अधिकाऱ्याचा हात असल्याचं उघड झाले आहे. बंगळुरूत सीबीआयनं  या अधिकाऱ्याला तब्बल ५ कोटी ७० लाखांच्या नव्या दोन हजारांच्या नोटांसह अटक केली. 

के मायकल असं या अधिका-याचं नाव असून हा आरबीआयचा अधिकारी असल्याचं निष्पन्न झालंय. याप्रकरणी मायकलसह एका जेडीएसच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. तसेच इतर चार बँकांच्या चार अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसात  जुन्या नोटा बदलून देण्याच्या रँकेटमध्ये अॅक्सिस बँकेच्या अधिका-यांना अटक करण्यात आली आहे. आता थेट आरबीआयचाच अधिकारी गजाआड गेल्यामुळं मोठी खळबळ माजली आहे.