कतरीनाला देशाची राष्ट्रपती बनवा - न्या. काटजू

सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि नुकतेच प्रेस परिषदेच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झालेले न्या. काटजू यांनी बॉलिवूडची सुंदर बाला अभिनेत्री कतरीना कैफ हिला राष्ट्रपती बनवण्याचा सल्ला दिलाय. 

Updated: Jan 15, 2015, 08:02 AM IST
कतरीनाला देशाची राष्ट्रपती बनवा - न्या. काटजू title=

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि नुकतेच प्रेस परिषदेच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झालेले न्या. काटजू यांनी बॉलिवूडची सुंदर बाला अभिनेत्री कतरीना कैफ हिला राष्ट्रपती बनवण्याचा सल्ला दिलाय. 

मंगळवारी, आपल्या ब्लॉगमध्ये लिहिताना त्यांनी कतरीना कैफ हिला भारताची राष्ट्रपती बनवायला हवं, असं म्हटलंय. काही दिवसापूर्वी क्रोएशिया इथं एका सुंदर महिलेला राष्ट्रपती बनवण्यात आलंय. यावरून, काटजूंना ही गुगली सुचली असावी... 'जर आर्थिक स्वरुपात आजारी पडलेला क्रोएशिया मिस ग्रॅबर किटरोविक यांना राष्ट्रपती बनवू शकतो, तर आपण का नाही' असं काटजूंनी म्हटलंय. 

कतरीना कैफ हिला राष्ट्रपती बनवताना त्यांनी एक अटही ठेवायला सांगितलंय. ती अट म्हणजे, 'राष्ट्रपती बनल्यानंतर शपथ ग्रहण सोहळ्यात कतरीनानं आपलं फेमस आयटम साँग 'शीला की जवानी' गायलाच हवं...' 

अनेकदा वादग्रस्त मुद्दयांवर आपल्या पद्धतीनं टीप्पणी साधणाऱ्या काटजू यांनी मिश्कील पद्धतीनं  ही टीका केलीय. 'निवडणुकीत मी नेहमीच सिनेमांतील नट्यांसारख्या सुंदर स्त्रियांना मतं देतो... कारण, नेता तर तुम्हाला नेहमीच चंद्र तोडून आणण्याच्या बाता मारतील, पण जनतेच्या हिताची कामं कधीच करणार नाहीत. पण, कुणाला ना कुणाला निवडून आणायचंय... तर, मग सुंदर चेहऱ्यालाच मतं का दिले जाऊ नयेत... कमीत कमी मीडियातमध्ये असे सुंदर चेहरे पाहून तुम्हाला क्षणिक सुख तरी लाभेल. अन्यथा, शेवटी तुमच्या हाती काहीच लागत नाही...' अशी टिप्पणी करत 'हरिओम' म्हणत त्यांनी आपला ब्लॉग संपवलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.