लखनऊ : एका मंत्र्याविरुद्ध फेसबुकवर पोस्ट लिहिली म्हणून एका पत्रकाराला जिवंत जाळण्यात आल्याचा प्रकार लखनऊमध्ये घडलाय.
उत्तरप्रदेशातील शाहजहांपूरमध्ये फेसबुकवर एक पोस्ट लिहिण्याची किंमत एका पत्रकाराला आपला जीव देऊन चुकवावी लागलीय. जगेंद्र सिंह असं या पत्रकाराचा नावं... ते गेल्या १५ वर्षांपासून पत्रकारितेत होते. जगेंद्र यांनी उत्तरप्रदेशातील मागासवर्ग कल्याण मंत्री राममूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध एक फेसबुक पोस्ट लिहिली होती.
सोशल वेबसाईटवर आपली बदनामी झाल्यामुळे नाराज झालेल्या मंत्र्यांनं जगेंद्र सिंह यांच्याविरुद्ध लूट, अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याची खोटी-खोटी तक्रारही दाखल केली होती.
त्यानंतर १ जून रोजी काही पोलिसांनी जगेंद्र यांच्या घरी जाऊन पहिल्यांदा त्यांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलं.
या घटनेत ६० टक्के भाजलेल्या जगेंद्र यांना लखनऊच्या एका हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. पण, त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं. १ जूनपासून जगेंद्र जगण्यासाठी झगडत होते.
एसपी बबलू कुमार यांनी मात्र या आरोपांना नकार दिलाय. जगेंद्र यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलीस चौकशीसाठी गेले असताना पत्रकारानं स्वत:ला पेटवून घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी शहर एसपींकडे सोपवण्यात आलीय. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.