बहुमत सिद्ध करण्यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री मांझी यांचा राजीनामा

बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी मैदानातून पळ काढल्याचे दिसत आहे. मी बहुमत सिद्ध करणारच, असा दावा मांझी यांनी गुरुवारी केला होता. मात्र, बहुमत सिद्ध करण्यापूर्वी आपल्या पदाचा त्यांनी राजीनामा राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे सोपविला. 

Updated: Feb 20, 2015, 11:04 AM IST
बहुमत सिद्ध करण्यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री मांझी यांचा राजीनामा title=

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी मैदानातून पळ काढल्याचे दिसत आहे. मी बहुमत सिद्ध करणारच, असा दावा मांझी यांनी गुरुवारी केला होता. मात्र, बहुमत सिद्ध करण्यापूर्वी आपल्या पदाचा त्यांनी राजीनामा राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे सोपविला. 

जेडीयूचे २७ आमदार माझ्या सोबत आहेत. भाजपच्या ८७ आमदारांचाही पाठिंबा आहे. दोन्ही मिळून एकूण संख्या ११४ होते. ही संख्या बहुमतासाठी आवश्यक असलेल्या (११७) आकड्यापेक्षा तीनने कमी आहे. तीन अपक्ष आमदारांनी ही उणीव भरून काढल्याचा मांझी यांचा दावा केला होता. मात्र, असे असताना त्यांनी बहुमत अजमावलेच नाही. त्यांनी राजकीय मैदानातून पळ काढल्याचे दिसत आहे. भाजपचा पाठिंबा त्यांना फळाला आला नाही.

बिहारची धुरा कोणाकडे जाणार यांची उत्सुकता होती. मांझी की नितीशकुमार? याची चर्चा होती. मात्र, मांझी यांनी मैदानातून बाहेर पडत आपल्या पदाचा राजीनामाच सोपला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री मांझी यांना बहुमत सिद्ध करायचे होते. भाजप मांझी यांच्या पाठीशी आहे. भाजपने मांझी यांना पाठिंबा असल्याची घोषणा गुरुवारी केली होती.

जेडीयूशी बंडखोरी केल्यामुळे मांझी यांना पक्षाने निलंबित केले. आता सभागृहात ते एकमेव असंलग्न आमदार आहेत. त्यांच्या आठ समर्थक आमदारांवर पाटणा हायकोर्टाने विश्वास ठरावावेळी मतदानावर बंदी घातली. दुसरीकडे विधानसभाध्यक्ष उदयनारायण चौधरी यांनी वेगळेच निर्णय घेतले. १०९ आमदारांच्या जेडीयूला विरोधी पक्ष म्हणून मान्यता दिली आणि भाजपचे नंदकिशोर यादव यांच्याऐवजी जेडीयूचे विजयकुमार चौधरींची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.