एलपीजी स्वस्त, जेटच्या इंधन महागले

 हवाई जेट इंधन (एटीएफ)च्या दरात ५.५ टक्क्यांनी वाढले आहे. लगोपाठ पाचव्या महिन्यात या इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.  तर विना सबसिडीच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत ११ रूपयांनी कपात करण्यात आली आहे. 

Updated: Jul 1, 2016, 05:39 PM IST
एलपीजी स्वस्त, जेटच्या इंधन महागले title=

नवी दिल्ली :  हवाई जेट इंधन (एटीएफ)च्या दरात ५.५ टक्क्यांनी वाढले आहे. लगोपाठ पाचव्या महिन्यात या इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.  तर विना सबसिडीच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत ११ रूपयांनी कपात करण्यात आली आहे. 
 
तेल कंपन्यांनी आज केलेल्या घोषणेनुसार जेट इंधनाच्या किंमतीत २५५७.७ रुपये प्रति किलोलीटर वाढले आहे. ५.४७ टक्के वाढीमुळे याचे दर ४९,२८७.१८ रुपये झाली आहे. गेल्या महिन्यात जेटच्या दरात ९.२ टक्क्यांनी वाढ केली होती. 

गेल्या पाच महिन्यात जेटचे इंधन २५ टक्क्यांनी वाढ करण्यात आहे. त्यामुळे एकून ९९८५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जेट इंधन अजूनही पेट्रोल आणि डिझेलपेक्षा तुलनेने स्वस्त आहे. 

कसे स्वस्त जेट इंधन

दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोलला ६४.७६ रुपये द्यावे लागतात तर डिझेलला ५४.७० रूपये द्यावे लागतात. तर लीटरमध्ये जेट इंधन ४९.२८ रुपये आहे. 

स्वयंपाकाचा गॅस स्वस्त 

दिल्लीमध्ये स्वयंपाकाच्या गॅसची किंमत प्रति सिलेंडर ५३७.५० पैसे होणार आहे. ११ रुपये स्वस्त होण्यापूर्वी ही किंमत ५४८.५० रुपये होती. तर सबसिडीच्या सिलेंडरची किंमत ४२१ .१६ रुपये आहे.