आज जयललितांच्या भवितव्याचा फैसला, कर्नाटक हायकोर्टात सुनावणी

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कर्नाटक हायकोर्टात हा फैसला होणार आहे.

Updated: May 11, 2015, 10:10 AM IST
आज जयललितांच्या भवितव्याचा फैसला, कर्नाटक हायकोर्टात सुनावणी title=

बंगळुरू: तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कर्नाटक हायकोर्टात हा फैसला होणार आहे.

या प्रकरणी जयललिता यांना चार वर्षाचा कारावास आणि १०० कोटी रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. या निर्णयाला जयललिता यांनी कर्नाटक हायकोर्टात आव्हान दिलंय.

जयललिता यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातल्या खटल्याकडे आज सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. बंगळुरु उच्च न्यायालयात आज त्याबाबत निर्णय सुनावला जाणार आहे. 
त्यामुळं मोठ्या संख्येनं जयललिता यांचे समर्थक बंगळुरु उच्च न्यायालयाबाहेर जमले आहेत. जयललिता यांचं समर्थन करणारे फलक घेऊन त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.