जम्मू : जम्मू काश्मीरमधल्या पुरात अडकलेल्या तुमच्या जवळच्या व्यक्तींना शोधण्यासाठी गूगलचं एक अॅप्लिकेश तुम्हाला मदत करू शकतं.
जम्मू-काश्मीरच्या पूरग्रस्त भागात शोध तसंच देखरेख क्षमता वाढविण्यासाठी राज्य सरकारनं उत्तराखंड पुरादरम्यान समोर आणलेल्या गूगलच्या एका सक्षम अॅप्लिकेशनची मदत घेतलीय.
'पर्सन फाईँडर' नावाचं हे गूगल अॅप विशिष्ट रुपात बनवण्यात आलंय.... यामुळे, आपत्कालीन परिस्थितीत प्रभावित झालेल्या लोकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना यावर पोस्ट करून आपल्या जवळच्या व्यक्तींच्या स्थितीची माहिती घेण्यात मदत मिळते. याशिवाय, तुम्ही एसएमएसच्या माध्यमातूनही माहिती मिळवू शकता. यासाठी मॅसेजमध्ये जाऊन टाईप कार 'search <नाव>' आणि पाठवा 9773300000 या नंबरवर...
गूगलच्या 'पर्सन फाईंडर'वर जाण्यासाठी इथे क्लिक करा
काय आहे पर्सन फाईंडर...
पर्सन फाईंडर नावाचं हे ऍप एक वेगळचं ऍप आहे. या ऍपमुळे संकटात अडकलेल्या लोकांनी आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रांना पोस्ट केल्यास त्यांचं लोकेशन सापडण्यास मोठी मदत होते. गेल्या वर्षी उत्तराखंडमध्ये झालेल्या तांडवातून बचाव करताना या ऍपची मदत घेण्यात आली होती.
गूगलकडून सरकारला ओपन सोर्स कंटेन्टबद्दल माहिती देण्यात आली असून या ओपन सोर्समध्ये जम्मू-काश्मीर आणि विशेषत: काश्मीरच्या खोऱ्यातील ठिकाणं आणि लोकांबद्दल विस्तृत माहिती आणि आकडेवारी. या ओपन सोर्सचा वापर आजपासूनच करता येण्याची शक्यता आहे.
केदारनाथ रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सेनेला जे अडथळे आणि अडचणी आल्या होत्या काहीशा तशाच अडचणी काश्मीरमधील रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सेने समोर आहेत. लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यापूर्वी त्यांचं लोकोशन शोधण्यातच जास्त अडचणी येतात. हेलिकॉप्टरमधूनही अनेकांना शोधणं कठिण होतं. नेटवर्क सिस्टिममध्ये बिघाड झाल्यानंही मदतीत अडचणी वाढल्यात. त्यामुळेच या अॅपचा उपयोग महत्त्वाचा ठरतोय कारण हे अॅप सेटेलाईट बेस आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गरजुंपर्यंत लवकरात लवकर मदत पोहोचेल.
अॅप एकदा एक्टिवेट केलं आणि अपडेट केल्याने रेस्क्यू टीमला पर्सन फाईंडरचा वापर कोणत्याही भागात अडकलेल्या लोकांना शोधून त्यांना तिथून सुरक्षित स्थळी हलवण्यात मदत होईल.
अॅक्टिवेट झाल्यानंतर या अॅपमुळे एनडीआरएफ, एअरफोर्सच्या रेस्क्यू टीम्सना मोठी मदत मिळेल आणि बचाव कार्याला वेग येईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.