मधेपुरा, बिहार: बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील एका मुलीनं तांत्रिकाच्या कचाट्यातून सुटत, बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या नराधमाला चांगलीच शिक्षा दिलीय. तिनं नराधमाचं लिंगच कापलं.
स्थानिक वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार पीडित मुलीचे आई-वडील तिला तांत्रिकाजवळ घेऊन गेले. उपचार करण्याच्या नावावर त्यानं मुलीला एका खोलीत नेवून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तांत्रिक मुलीचा काका असल्याचं कळतंय.
पीडित मुलीनं तांत्रिकाविरोधात मधेपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवलीय. आरोपी तांत्रिक फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17-18 वर्षाच्या या मुलीवर यापूर्वी मागील महिन्यात तिचा काका असलेल्या तांत्रिकानं बलात्कार केला होता.
मुलीनं घडलेली पूर्ण घटना ग्राम पंचायतीसमोर सांगितली, मात्र तिला न्याय मिळाला नाही. त्यानंतर निराश मुलीनं स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्यासमोर आपली तक्रार नोंदवली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.