आता रेल्वे बुकिंग होईल फास्ट, उच्च क्षमतेचे सर्व्हर कार्यरत

रेल्वेनं तात्काळ तिकीट बुकिंग क्षमता वाढविण्यासाठी दोन उच्च क्षमतेचे सर्व्हर बसविले आहेत. ज्यामुळे प्रति मिनीट १४,००० तिकीट बुकिंग करता येणार आहेत. 

Updated: Jun 7, 2015, 03:14 PM IST
आता रेल्वे बुकिंग होईल फास्ट, उच्च क्षमतेचे सर्व्हर कार्यरत title=

नवी दिल्ली : रेल्वेनं तात्काळ तिकीट बुकिंग क्षमता वाढविण्यासाठी दोन उच्च क्षमतेचे सर्व्हर बसविले आहेत. ज्यामुळे प्रति मिनीट १४,००० तिकीट बुकिंग करता येणार आहेत. 

आयआरसीटीसीनं सकाळच्या व्यस्त वेळेत प्रति मिनीट ७२०० ऐवजी १४,००० तिकीट बुकिंग करण्यासाठी हे दोन सर्व्हर बसविले आहेत. दरदिवशी दहा वाजता उघडताच पुढील १५ मिनीटात तिकीट बुकिंगमध्ये खूप गोंधळ उडतो. 

आयआरसीटीसीचे अध्यक्ष डॉ. ए. के. मनोचा यांनी सांगितलं की, वेबसाइटच्या क्षमतेत वाढ, उन्हाळ्यातील तात्काळ तिकीटांची मागणी आणि ऑनलाईन आरक्षणादरम्यान येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी ही उपाययोजना केली आहे.  याचे सकारात्मक परिणाम सुरूवातीपासूनच दिसत आहेत, असंही ते म्हणाले. 

देशातील ५४ टक्के तिकीट बुकिंग आयआरसीटीसीवरून केले जाते. पोर्टलच्या माध्यमातून दर दिवशी सुमारे साडे पाच ते सहा लाख तिकीटांची विक्री होते. या पोर्टलचे तीन कोटी अधिकृत वापरकर्ते असून हे जगातील दुसरे सर्वात व्यस्त पोर्टल आहे. या पोर्टलने १४,८०० तिकीटांच्या विक्रीचे रेकॉर्ड केले आहे. आयआरसीटीसीने २००२ मध्ये ई-तिकीट सुविधा सुरू केली. वेबसाइटला एप्रिलमध्ये प्रथमच अद्ययावत करण्यात आले आहे. यामुळे १,५०,००० वापरकर्ते सांभाळता येऊ शकतात तसेच १००० चौकशींना उत्तर देता येते. 

डॉ. मनोचा पुढे म्हणाले की, एवढ्या सुधारणा करूनही आपल्या आवडीच्या ठिकाणी गाड्यांच्या अपुऱ्या क्षमतेमुळे तात्काळ तिकीटांची मागणी पूर्ण करता आली नाही.  एचपी इटेनिअम सर्व्हरमुळे आता ही क्षमता ३,००,००० तर चौकशीसाठी ३,००० करण्यात आली. आयआरसीटीसीवरून लॉगिन करणं आता अधिक सोपं आणि प्रभावी झाले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.