आठशे वर्षांनंतर भारताला हिंदू शासक मिळाला... संसदेत गदारोळ

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला. गेल्या आठशे वर्षानंतर भारताला हिंदू शासक मिळाल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्याचा आरोप सीपीएमचे खासदार मोहम्मद सलिम यांनी केला.

Updated: Nov 30, 2015, 03:57 PM IST
आठशे वर्षांनंतर भारताला हिंदू शासक मिळाला... संसदेत गदारोळ  title=

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला. गेल्या आठशे वर्षानंतर भारताला हिंदू शासक मिळाल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्याचा आरोप सीपीएमचे खासदार मोहम्मद सलिम यांनी केला.

एका नियतकालीकाचा लोकसभेत दाखला देऊन त्यांनी हे आरोप केलेत. तसंच राजनाथ सिंहांनी माफी मागावी अशी मागणी खासदार सलीम यांनी केली. मात्र राजनाथ सिंह यांनी हा आरोप चुकीचा असून असं वक्तव्य केल्याचं सिद्ध झाल्यास राजीनामा देणार असं आव्हान दिलं.

त्यामुळं आक्रमक झालेल्या भाजपनंही सलीम यांनी माफी मागावी अशी मागणी केलीय. तर सलिम हेदेखील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.  

या मुद्यावरून तब्बल तीनदा कामकाज तहकूब करण्यात आलंय. यामुळं मात्र असहिष्णूतेवरील चर्चा बाजुला पडली असून कामकाजही ठप्प झालंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.