मुलांच्या हॉस्टेलमध्ये मुलगी आढळल्याने गोंधळ

सीएसएस युनीवर्सिटीच्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये मुलगी आढळल्याने एकच गोंधळ उडाला. वृत्तवाहिनीच्या एका कॅमेरामनला हॉस्टेलमधल्या मुलांनी मारहाण केली. याविरोधात पोलिंसानी विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Updated: Dec 29, 2015, 11:37 PM IST
मुलांच्या हॉस्टेलमध्ये मुलगी आढळल्याने गोंधळ title=

कानपूर : सीएसएस युनीवर्सिटीच्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये मुलगी आढळल्याने एकच गोंधळ उडाला. वृत्तवाहिनीच्या एका कॅमेरामनला हॉस्टेलमधल्या मुलांनी मारहाण केली. याविरोधात पोलिंसानी विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

दीप यादव या मुलाच्या खोलीमध्ये मुलगी असल्याची माहिती डीन आणि अन्य अधिकाऱ्यांना कळाल्यानंतर ते त्या ठिकाणी पोहोचले. त्यांच्यासोबत काही पत्रकारही होते.

मुलीसोबत जेव्हा चौकशी केली तेव्हा तिने दीपची वधू असल्याचं म्हटलं त्यानंतर मुलीच्या बहिणीला फोन करुन बोलवण्यात आलं आणि तिच्या सोबत त्या मुलीला घरी पाठवलं.