इंदिरांच्या आणीबाणीला आरएसएसचं समर्थन होतं-राजेश्वर

आयबीचे माजी प्रमुख टीव्ही राजेश्वर यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. राजेश्वर यांनी केलेल्या दाव्यानुसार, इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीला आरएसएसचं समर्थन होतं, यासाठी तत्कालीन संघ प्रमुख बाळासाहेब देवरस, हे इंदिरा गांधी यांच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न करत होते.

Updated: Sep 22, 2015, 02:44 PM IST
इंदिरांच्या आणीबाणीला आरएसएसचं समर्थन होतं-राजेश्वर title=

नवी दिल्ली : आयबीचे माजी प्रमुख टीव्ही राजेश्वर यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. राजेश्वर यांनी केलेल्या दाव्यानुसार, इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीला आरएसएसचं समर्थन होतं, यासाठी तत्कालीन संघ प्रमुख बाळासाहेब देवरस, हे इंदिरा गांधी यांच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न करत होते.

राजेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार बाळासाहेब देवरस यांनी, आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या काही मुद्द्याचं समर्थन केलं होतं, बाळासाहेब देवरस हे १९७० मध्ये संघ प्रमुख होते. १९७५ मध्ये लावण्यात आलेली आणीबाणी १९ महिने होती.

राजेश्वर यांनी म्हटलंय की, इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीच्या दुष्परीणामाचा परिणाम त्यांना माहित नव्हता, किंवा ते यावर लोकांची काय मते तयार होत आहेत, याची गंभीरता समजून घेऊ शकले नाहीत.

आणीबाणी लावण्यात आली होती, ते राजेश्वर हे आयबीचे उप-प्रमुख होते, इंदिरा गांधी यांना सहा महिन्यातच आणीबाणी उठवायची होती, मात्र याचा आनंद घेणारे संजय गांधी यांना हे मान्य नव्हतं.

राजेश्वर असं म्हणतात की, बाळासाहेब देवरस यांना इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांना भेटायचं होतं, पण त्यांना भेटण्यास इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांनी नकार दिला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.