देशातील ही शहरे होणार स्मार्ट, २० शहरांची नावे जाहीर

देशातल्या स्मार्ट सिटींच्या पहिल्या टप्प्यातल्या २० शहरांची यादी केंद्रीय नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज जाहीर केलीत. 

Updated: Jan 28, 2016, 06:47 PM IST
देशातील ही शहरे होणार स्मार्ट, २० शहरांची नावे जाहीर title=

नवी दिल्ली : देशातल्या स्मार्ट सिटींच्या पहिल्या टप्प्यातल्या २० शहरांची यादी केंद्रीय नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज जाहीर केलीत. 

या पहिल्या यादीत महाराष्ट्रातल्या पुणे आणि सोलापूर या दोन शहरांचा समावेश करण्यात आलाय. सीमाभागातल्या बेळगावचाही या यादीत समावेश आहे.

 

मध्यप्रदेशातल्या तीन शहरांचा या यादीत समावेश करण्यात आलाय. तर उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील एकाही शहराचा या यादीत समावेश नाही. या पहिल्या यादी महाराष्ट्रातल्या किती शहरांचा समावेश होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. मात्र, दोन शहरांना स्थान देण्यात आलेय.

देशातल्या एकूण ९७ शहरांनी स्मार्ट सिटी योजनेच्या लाभासाठी अर्ज भरले होते. पहिल्या यादीततील स्मार्ट सिटी योजनेसाठी चालू आर्थिक वर्षात खर्च करण्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या ५०० कोटींच्या निधीतून आर्थिक मदत मिळणार आहे. प्रत्येक वर्षाला १०० कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

ही शहरे होणार स्मार्ट सिटी
स्मार्ट सिटीच्या यादीत पहिले स्थान भुवनेश्वर , दुसरे पुणे, जयपूर, कोच्ची, अहमदाबाद, जबलपूर, विशाखापट्टणम, सोलापूर, धवनगिरी, इंदूर, नवी दिल्ली, कोइंबतूर, काकीनाडा, बेळगाव, उदयपूर, गोवाहाटी, चेन्नई, लुधियाना, भोपाळ