मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या गृहकर्जावरील व्याजदरात कपात केल्यानंतर आता आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेचेही गृहकर्ज स्वस्त झालेय.
आयसीआयसीआय आणि एचडीएफसीने व्याजदरात 0.15 टक्क्यांची कपात केलीय. एचडीएफसी बँकेने 75 लाखापर्यंतच्या कर्जासाठी महिलांसाठी व्याजदरात 9.15 टक्क्यापर्यंत तर इतरांसाठी 9.20 टक्क्यापर्यंत कपात केलीये.
दुसरीकडे आयसीआयसीनेही गृहकर्जावरील व्याजदरात महिलांसाठी 9.15 टक्क्यांपर्यंत कपात केलीये. याआधी हा दर 9.30 टक्के इतका होता. तर इतरांसाठीच्या व्याजदरात कपात करुन हा दर 9.35 टक्क्यांवरुन 9.20 टक्क्यांवर आणलाय. हे नवे व्याजदर शुक्रवारपासून लागू होणार आहेत.