सलमानप्रमाणेच माझीही सुटका होईल : आसाराम बापू

'हिट अँड रन' प्रकरणात अभिनेता सलमान खानला उच्च न्यायालयाने आरोपातून निर्दोष मुक्त केल्यानंतर आसाराम बापूंनाही आपली सुटका होईल अशी आशा वाटतेय. सलमानप्रमाणेच आपलीही सुटका होईल असे आसाराम यांनी शनिवारी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाने २००२मधील हिट अँड रन प्रकरणात सलमानची मुक्तता केली.

Updated: Dec 13, 2015, 09:21 AM IST
सलमानप्रमाणेच माझीही सुटका होईल : आसाराम बापू title=

नवी दिल्ली : 'हिट अँड रन' प्रकरणात अभिनेता सलमान खानला उच्च न्यायालयाने आरोपातून निर्दोष मुक्त केल्यानंतर आसाराम बापूंनाही आपली सुटका होईल अशी आशा वाटतेय. सलमानप्रमाणेच आपलीही सुटका होईल असे आसाराम यांनी शनिवारी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाने २००२मधील हिट अँड रन प्रकरणात सलमानची मुक्तता केली.

आसाराम बलात्कार प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात आहे. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टात जात असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी ही निर्दोष आहे आणि सलमान खान प्रमाणेच माझीही लवकरच तुरुंगातून सुटका होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला. आसाराम यांचे पुत्र नारायण साईही बलात्कार प्रकरणात तुरुंगात आहेत.

आसाराम आणि नारायण साई यांच्या अटकेनंतर या प्रकरणातील नऊ साक्षीदारांवर हल्ले झाले त्यातील तीन साक्षीदारांचा मृत्यू झाला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.