नवी दिल्ली : दिल्लीत आप पक्षाची जंतरमंतरवर सभा होती, त्या दरम्यान एका शेतकऱ्यांने आत्महत्या केली, यावर सरकार म्हणून भाजपने आपली जबाबदारी न पाहता थेट आपवर हल्ला चढवला आहे,
जंतरमंतरवर आज मानवतेची हत्या झाली आहे, शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे माहित असूनही केजरीवाल यांनी भाषण का सुरू ठेवले, असा सवाल भाजपाने उपस्थित केला आहे.
आम आदमी पक्षाच्या रॅलीदरम्यान शेतकऱ्याने आज आत्महत्या केली. बुधवारी आपच्या रॅलीदरम्यान एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. याबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आम आदमी पक्षाचा हा कट असल्याचा आरोप केला आहे.
संबंधित शेतकरी मरणार असल्याचे माहित असतानाही केजरीवाल यांनी भाषण सुरूच ठेवल्याचेही त्यांनी पुढे म्हटले आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. 'जंतरमंतर येथे शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी ऐकून तीव्र दु:ख झाले' असं म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.