मॅकेनिकच्या मुलाने मिळवली एका कोटींची शिष्यवृत्ती

आयूष शर्मा या १७ वर्षाच्या मुलाने जगप्रसिद्ध 'मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'मध्ये जागा मिळवली आहे. यासोबतच आयूषला एक कोटी रूपयांची शिष्यवृत्तीही मिळालीय. या एक कोटी रूपयात त्याचा शैक्षणिक खर्च भागवला जाणार आहे. 

Updated: Apr 11, 2015, 07:34 PM IST
मॅकेनिकच्या मुलाने मिळवली एका कोटींची शिष्यवृत्ती title=

कानपूर : आयूष शर्मा या १७ वर्षाच्या मुलाने जगप्रसिद्ध 'मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'मध्ये जागा मिळवली आहे. यासोबतच आयूषला एक कोटी रूपयांची शिष्यवृत्तीही मिळालीय. या एक कोटी रूपयात त्याचा शैक्षणिक खर्च भागवला जाणार आहे. 

आयुषचे वडील मॅकेनिक आहेत. याआधी ते सीआरपीएफमधून कॉन्स्टेबल म्हणून निवृत्त झाले आहेत. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जागा मिळवलेल्या तीन भारतीय मुलांमध्ये समावेश झाल्यानं सध्या आयूषचा आनंद गगनात मावेनासा झालाय. 

'फिजिक्स' या विषयात आयुषला खूप आवड आहे. कानपूर केंद्रीय विद्यालयातून त्याने टॉप केलं आहे. दोन वर्षांपूर्वी आयआयटी ग्रॅज्युएटमध्ये कोचिंग घेण्यास त्याने सुरूवात केली होती.  

सप्टेंबरपासून मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील आयुषच्या शिक्षणाला आणि अर्थातच नवीन आयुष्याला सुरूवात होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.