'एचआयव्ही' बाधित असल्याचं माहीत असूनही त्यानं जोडले 300 महिलांशी संबंध

आपल्याला 'एचआयव्ही'ची लागण झालीय हे माहीत असूनही एका विकृत व्यक्तीनं जवळपास 300 महिलांशी असुरक्षित शरीरसंबंध जोडल्याचं धक्कादायक सत्य नुकतंच उघडकीस आलंय. 

Updated: Oct 21, 2015, 02:56 PM IST
'एचआयव्ही' बाधित असल्याचं माहीत असूनही त्यानं जोडले 300 महिलांशी संबंध title=

हैदराबाद : आपल्याला 'एचआयव्ही'ची लागण झालीय हे माहीत असूनही एका विकृत व्यक्तीनं जवळपास 300 महिलांशी असुरक्षित शरीरसंबंध जोडल्याचं धक्कादायक सत्य नुकतंच उघडकीस आलंय. 

घरफोडीच्या आरोपाखाली पोलिसांनी नुकतीच 31 वर्षांच्या एका रिक्षाचालकाला अटक केली. या रिक्षाचालकानं आपल्याच मित्राच्या घरी चोरी केल्याचं उघड झालं. परंतु, त्याची अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांसमोर त्यानं हे धक्कादायक सत्य उघड केलं. 

आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह आहोत आणि आत्तापर्यंत जवळपास 300 हून अधिक गृहिणींशी आणि वेश्यांसोबत आपणं शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचं त्यानं मान्य केलं. हा आरोपी मलकाजगिरीच्या मिरजालगुडाचा रहिवासी आहे. 

त्यानं यापूर्वी तीन विवाह केले पण, त्याच्या करामतींना वैतागून त्याच्या तीनही पत्नींनी त्याची सोबत सोडली. त्यानंतर त्यानं अनेक महिलांशी संबंध जोडले... दरदिवस वेगवेगळ्या वेश्यांशी असुरक्षित संबंध जोडल्याचं त्यानं मान्य केलंय.

यानंतर, असुरक्षित सेक्स करणाऱ्या इतरांनाही एचआयव्ही आणि एडसचा धोका वाढल्याचं समोर येतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.