गोहत्या करणाऱ्याचा वध करणं पाप नाही - पांचजन्य

दादरीमध्ये गोमांस खाल्ल्याच्या केवळ संशयावरून जमावाकडून हत्या करण्यात आलेल्या अखलाखच्या विषयावर बोलताना 'गोहत्या करणाऱ्याचा वध करणं हे काही पाप नाही' असं 'पांचजन्य'चा लेखक तुफैल चतुर्वेदी यांनी म्हटलंय. पांचजन्य हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र समजलं जातं.

Updated: Oct 21, 2015, 01:32 PM IST
गोहत्या करणाऱ्याचा वध करणं पाप नाही - पांचजन्य title=

मुंबई : दादरीमध्ये गोमांस खाल्ल्याच्या केवळ संशयावरून जमावाकडून हत्या करण्यात आलेल्या अखलाखच्या विषयावर बोलताना 'गोहत्या करणाऱ्याचा वध करणं हे काही पाप नाही' असं 'पांचजन्य'चा लेखक तुफैल चतुर्वेदी यांनी म्हटलंय. पांचजन्य हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र समजलं जातं.

'बीबीसी'शी बोलताना चतुर्वेदी यांनी हे विधान केलंय. परंतु, अखलाखच्या घरात जे मांस होतं ते गोमांस नव्हतं तर चिकन होतं, हे यापूर्वीच फॉरेन्सिक रिपोर्टमधून समोर आलंय.

'दादरी घटना ही क्रियावर प्रतिक्रिया होती... वेदांमध्ये हे स्पष्टपणे सांगण्यात आलंय की गोहत्या करणाऱ्या पातकीचा वध करणं हे काही पाप नव्हे...' असं चतुर्वेदी म्हणतायत. परंतु हे नेमकं कोणत्या वेदात म्हटलं गेलंय, असा जेव्हा त्यांना प्रतिप्रश्न करण्यात आला तेव्हा त्यांच्याकडे याचं नेमकं उत्तर नव्हतं. 

'मदरसे आणि भारताचं मुस्लिम नेतृत्व भारताच्या मुसलमानांना आपल्या प्रत्येक परंपरेचा तिरस्कार करण्याची शिकवणं देतं... त्याचच फळ म्हणजे, अखलाखनं गायीची कुर्बानी दिली असावी' असं चतुर्वेदी यांनी आपल्या लेखात म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.