हिंदू कन्येचं मुस्लीम कुटुंबानं केलं कन्यादान

सध्या देशात काही जण धार्मिक, सांप्रदायिक तेढ, तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, मध्यप्रदेशच्या एका मुस्लीम कुटुंबानं मात्र एक अनोखं उदाहरण इतरांसमोर ठेवलंय. 

Updated: Jan 20, 2015, 07:56 PM IST
हिंदू कन्येचं मुस्लीम कुटुंबानं केलं कन्यादान title=

भोपाळ : सध्या देशात काही जण धार्मिक, सांप्रदायिक तेढ, तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, मध्यप्रदेशच्या एका मुस्लीम कुटुंबानं मात्र एक अनोखं उदाहरण इतरांसमोर ठेवलंय. 

भोपाळजवळच्या नर्मदा नदीवरील बुदनी घाटावर उभारलेल्या राम-जानकी मंदिरात शनिवारी एका मुलीचा विवाहसोहळा पार पडला. हा विवाह एका हिंदू मुलीचा होता आणि तिचं कन्यादान केलं ते एका मुस्लिम कुटुंबानं... तेही सगळ्या हिंदू परंपरांनुसार... 

काही वर्षांपूर्वी बरखेडा रेल्वे स्टेशनवर शारदा ही मुलगी एका मुस्लीम कुटुंबाला बेवारस स्थितीत आढळली होती. शारदाच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. तेव्हा या मुलीला रायसेन जिल्ह्यातील एका संस्थेला सोपवण्यात आलं. इथंच तिचं पालन-पोषण-शिक्षण पूर्ण झालं.   

डॉ. नुरुन्निसा आणि कुटुंबियांनी तिला शिक्षणासाठी भोपाळला पाठवलं. त्यानंतर शारदेसाठी दुर्गाप्रसाद पटेल यांचं स्थळ पसंत करण्यात आलं. शनिवारी शारदा आणि दुर्गाप्रसाद यांचा विवाह राम-जानकी मंदिरात पार पडला. वैदिक मंत्रासोबत एका डॉ. नुरुन्निसा आणि कुटुंबीयांनी शारदेचं कन्यादान केलं.... आणि उपस्थितांचे डोळे पाणावले.

एका मुस्लिम कुटुंबाद्वारे एका हिंदू तरुणीचा विवाह सांप्रदायिक सद्भावनेचं एक अनोखं उदाहरण म्हणूनच समोर आलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.