रस्त्यावर गाडी पार्किंग केली तर भरा 1000 रुपये दंड!

रस्त्यावर गाडी पार्क केली तर आता तुम्हाला तब्बल 1000 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो... होय, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये रस्त्यावर कार थांबवण्यासाठी आता नागरिकांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागू शकतं. 

Updated: Jan 20, 2015, 03:14 PM IST
रस्त्यावर गाडी पार्किंग केली तर भरा 1000 रुपये दंड! title=

नवी दिल्ली : रस्त्यावर गाडी पार्क केली तर आता तुम्हाला तब्बल 1000 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो... होय, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये रस्त्यावर कार थांबवण्यासाठी आता नागरिकांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागू शकतं. 

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं राष्ट्रीय राजधानी दिल्लीत रस्त्यावर गाडी पार्क करण्यासाठी बंदी घातलीय. या नियमाचं उल्ल्ंघन करणाऱ्या गाडीधारकांवर तब्बल एक हजार रुपयांचा दंड लागणार आहे. 

न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एका खंडपीठानं लोकांना पक्क्या रस्त्यांवर वाहन उभं करण्यासाठी सोमवारपासून बंदी घातलीय. दिल्ली पोलीस, स्टेशन प्रभारी आणि संबंधित नगरपालिकांना या नियमांचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेत. 

सुनावणीदरम्यान एनसीआरमध्ये हवेच्या गुणवत्तेचा एक अहवाल सादर करण्यात आला होता. ज्यामध्ये दिल्लीच्या हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात प्रदूषित असल्याचं स्पष्ट झालं. निश्चित स्वरुपात हे मानवी स्वास्थ्य आणि पर्यावरणासाठी धोकादायक आहे. त्यामुळे, खंडपीठानं दिल्लीच्या पक्क्या रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची गाडी उभी करण्यास बंदी घातलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.