बाईच्या नादाला चटावलेल्या बुरहान वानीचा 'आत्मघातकी' खात्मा

शुक्रवारी झालेल्या गोळीबारात ठार करण्यात आलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी हा गेल्या अनेक दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांपासून लंपडाव खेळण्यात यशस्वी होत होता. पण, आता मात्र त्याला त्याच्याच कृत्यांमुळे जीवाला मुकावं लागलं. 

Updated: Jul 12, 2016, 10:14 AM IST
बाईच्या नादाला चटावलेल्या बुरहान वानीचा 'आत्मघातकी' खात्मा title=

नवी दिल्ली / श्रीनगर : शुक्रवारी झालेल्या गोळीबारात ठार करण्यात आलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी हा गेल्या अनेक दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांपासून लंपडाव खेळण्यात यशस्वी होत होता. पण, आता मात्र त्याला त्याच्याच कृत्यांमुळे जीवाला मुकावं लागलं. 

सुरक्षा दल अनेक दिवसांपासून बुरहान वानीचा शोध घेत होतं. मिळालेल्या माहितीनुसार, बुरहान वानी फसला गेला तो त्याच्याच एका पूर्व प्रेयसीनं दिलेल्या बातमीमुळे... या मुलीनं पोलिसांपर्यंत त्याचा ठावठिकाणा पोहचवल्यानं त्याचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं.

अनेक मुलींशी अनैतिक संबंध

आकर्षक दिसणाऱ्या अवघ्या २२ वर्षांचा बुरहान वानीचे अनेक मुलींसोबत अनैतिक संबंध होते... हे समजल्यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडनं त्याच्याशी संबंध तोडले होते. यामुळेच ती निराशही झाली होती. आपल्या प्रेयसीला फसवून बुरहान वानीनं एकप्रकारे 'आत्मघात'च केला होता. यामुळेच तिनं वानी अनंतनागमध्ये आल्याची बातमी सुरक्षा दलाला दिली. यानंतर सुरक्षा दिलानं त्याच्या गावाला वेढलं... आणि झालेल्या गोळीबारात बुरहान वानी आपल्या साथीदारांसोबत ठार झाला. 

१४ व्या घरातून पळाला 

हिजबुलचा हा 'पोस्टर बॉय' बुरहान त्रालचा रहिवासी होता. त्याच्यावर १० लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. 

दक्षिण काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनला पुन्हा जिवंत करणारा वानी गेल्या सात वर्षांपासून अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी झाला होता. तो १४ व्या वर्षीच घरातून पळून गेला होता.