ऑनलाईन छेडछेडीविरोधात आता स्पेशल सेल

महिलांची कुणीही ऑनलाईन छेड काढत असेल तर त्याची आता खैर नाही.

Updated: Jul 11, 2016, 11:34 PM IST
ऑनलाईन छेडछेडीविरोधात आता स्पेशल सेल  title=

नवी दिल्ली : महिलांची कुणीही ऑनलाईन छेड काढत असेल तर त्याची आता खैर नाही. केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागानं एक विशेष सायबर सेल तयार केलाय. महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी ही घोषणा केली आहे. 

एका मुलीचा फोटो फोटोशॉपमध्ये आक्षेपार्ह फॉरमॅटमध्ये करण्यात आला, त्यामुळे त्या मुलीनं आत्महत्या केली. अशा घटना रोखण्यासाठी आता पुढाकार घेण्यात आला आहे. 

यासंदर्भातल्या तक्रारी मला ईमेल करा, असं आवाहन मनेका गांधींनी करताच, अशा प्रकारच्या हजारो तक्रारी समोर आल्या. त्यामुळे अशा प्रकारच्या तक्रारींसाठी या विशेष सायबर सेलची निर्मिती करण्यात आली आहे. ज्या मुलींना ऑनलाईन छेडछाडीचा किंवा अत्याचाराचा त्रास होईल, त्यांनी # I am trolled वापरुन मनेका गांधींना ट्विट करायचं आहे.