हेमराजच्या शिरासाठी कुटुंबासोबत संपूर्ण गावाचं उपोषण

शस्त्रसंधीचं उल्लंघन करून पाकिस्तानी सैनिकांनी दोन भारतीय सैनिकांचे प्राण घेतले. एवढंच नाही, तर त्यांच्या प्रेतांची विटंबना करत लांस नाईक हेमराजचं शीर पाकिस्तानी सैनिक घेऊनही गेले. या घटनेमुळे हेमराजच्या कुटुंबासोबतच संपूर्ण देश संतप्त झाला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 13, 2013, 09:06 AM IST

www.24taas.com, नवीदिल्ली
शस्त्रसंधीचं उल्लंघन करून पाकिस्तानी सैनिकांनी दोन भारतीय सैनिकांचे प्राण घेतले. एवढंच नाही, तर त्यांच्या प्रेतांची विटंबना करत लांस नाईक हेमराजचं शीर पाकिस्तानी सैनिक घेऊनही गेले. या घटनेमुळे हेमराजच्या कुटुंबासोबतच संपूर्ण देश संतप्त झाला आहे.
‘माझ्या मुलाचं धडावेगळं झालेलं शिर परत घेऊन या... त्याचा चेहरा पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही’ असं म्हणत या मातेनं टाहो फोडला होता. हेमराज यांच्या अंत्यसंस्कारानंतर शहीद हेमराजच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण गाव उपोषणावर बसले आहेत. हेमराज यांचे शिर परत मिळावे यासाठी सगळे गावकरी उपोषणावर बसले आहे.
उत्तर प्रदेश सरकारने शहीदाच्या कुटुंबियांना वीस लाखांची मदत जाहीर केली आहे. समाजवादी पक्षाचे नेते रामआरसे कुशवाहा यांनी म्हटलं की, गावक-यांची नाराजी योग्य नाही.