Social Influencer Arrested: हैदराबादमधील आउटर रिंग रोडवर मनी हंटचा व्हिडीओ व्हायकल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून पोलीसांनी या प्रकरणात एका सोशल मीडिया इन्फ्युएन्सरला अटक केली आहे. इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर बेजबाबदारपणे वर्तवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आरोपी हा हैदराबादमधील बालानगर येथील रहिवाशी असून तो स्थानिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. सोशल मीडिया इन्फ्युएन्सरचं नाव भानुचंदर ऊर्फ अँकर चंदू असं आहे. चंदू हा 30 वर्षांचा असून चौकशीसाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये आरोपी चंदू घाटकेसर येथील ओआरआर एक्झिटच्या 9 नंबरच्या रस्त्याजवळ 200 रुपयांच्या नोटांचं बंडल फेकताना दिसत आहे. मी टाकत असलेला पैशांचा बंडल शोधून दाखवण्याचं आव्हान चंदू त्याच्या फॉलोअर्सला या व्हिडीओतून करताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदूने रस्त्याच्या बाजूला 20 हजार रुपये मुल्याच्या नोटांचे बंडल फेकले.
या व्हिडीओमध्ये आधी चंदूने त्याच्या हातात असलेले नोटांचे तीन ते चार बंडल दाखवले आहेत. आपण कोठे उभे आहोत हे त्याने रस्त्यावरील दिशादर्शक फलकाच्या मदतीने सांगितलं आहे. त्यानंतर हातातील बंडल रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडीमध्ये फेकले. व्हिडीओमध्ये या व्यक्तीने आपण 20 हजार रुपयांच्या नोटांचे बंडल या झाडीमध्ये फेकले आहेत. जो कोणी हे बंडल शोधेल त्याने ते पैसे ठेवावेत असं चंदूने त्याच्या फॉलोअर्सला सांगितलं.
Hyderabad: YouTuber’s Viral ‘Money Hunting Challenge’ Video Sparks Chaos on ORR, Case Registered
: The Ghatkesar Police have registered a case against a YouTuber whose viral video titled ‘Money Hunting Challenge’ caused a public disturbance on the Outer Ring Road (ORR). The… pic.twitter.com/pJWqxLYGjv
— Sudhakar Udumula (@sudhakarudumula) December 18, 2024
त्यानंतर हे पैसे शोधण्यासाठी अनेकजण या भागात फिरु लागले. अनेकजण हे फेकलेले पैसे शोधण्यासाठी व्हिडीओत दाखवलेल्या लोकेशनचा शोध घेत सदर रस्त्यावर फरत होते. या ठिकाणी जमा झालेल्या लोकांची संख्या एवढी होती की या ठिकाणी वाहतूककोंडी झाली. अनेकजण जीव धोक्यात घालून कार धावत असतानाही रस्त्याच्या बाजूला फेकलेल्या या नोटांचे बंडल शोधण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे केवळ या लोकांचाच नाही तर कारचालकांचाही जीव धोक्यात आला असता. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी या व्यक्तीविरोधात कारवाई केली आहे.
ओआरआरवर लोकांची गर्दी वाढल्याने आणि वाहनांना अडथळा निर्माण झाल्याने पोलिसांची चिंता वाढली. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांना अतिरिक्त पोलीस सुरक्षेची तरतूद करावी लागली. भारतीय न्याय संहितेबरोबरच राष्ट्रीय महामार्ग अधिनियमनअंतर्गत चंदूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.