गुप्त सरस्वती नदीचा लागला शोध...

सरस्वती नदी गुप्त स्वरुपात असल्याची आख्यायिका तुम्हीही ऐकली असेल. पण, हीच नदी आता सर्वांसमोर आलीय. सरस्वती नदीच्या शोधात एक मोठा विजय हाती लागलाय, असं म्हणायला हरकत नाही. 

Updated: May 7, 2015, 05:13 PM IST
गुप्त सरस्वती नदीचा लागला शोध...  title=

यमुनानगर (हरियाणा) : सरस्वती नदी गुप्त स्वरुपात असल्याची आख्यायिका तुम्हीही ऐकली असेल. पण, हीच नदी आता सर्वांसमोर आलीय. सरस्वती नदीच्या शोधात एक मोठा विजय हाती लागलाय, असं म्हणायला हरकत नाही. 

यमुनानगरच्या आदिब्रदी इथून केवळ पाच किलोमीटर अंतरावर मुगलवाली गावात 'मनरेगा' योजनेंतर्गत काही मजूर काम करत होते. इथं, गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सरस्वती नदीच्या शोधार्थ खोदकाम सुरू करण्यात आलं होतं. 

यावेली, खोदकाम सात आठ फुट खोलही गेलं नसेल तेवढ्यातच जलधारेचा एक जिवंत स्रोत सगळ्यांच्या दृष्टीस पडला. अगोदर थोडंच पाणी निघालं पणं जसजसं खोदकाम केलं गेलं... तसतसं पाण्याचा स्रोत वाढतच गेला. पाहता पाहता चार ठिकाणांहून पाणी जमा होऊ लागलं... पाणी पाहताच मजूर तिथं जमा झाले... यानंतर मजुरांनी आणखी 8-10 खड्डे खोदले आणि सर्वच ठिकाणांहून पाणी जमिनीवर येऊ लागलं.

जाणकारांच्या म्हणण्यानुसार हा सरस्वती नदीचा शोधचं आहे. पण, पुरातत्व विभाग मात्र यावर काही बोलताना सावधानी बाळगताना दिसतंय. 

मुगलवाली गावाच्या उपायुक्तांच्या म्हणण्यानुसार, सरस्वती नदीचा उल्लेख केवळ पुराणकथांमध्ये आढळतो आज ती प्रत्यक्ष रुपात जमिनीवर अवतरलीय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 एप्रिल रोजी सरकारनं मनरेगा योजनेंतर्गत सरस्वती नदीच्या शोधार्थ खोदकाम सुरू केलं होतं. 

पुरातत्व विभागानं ही सरस्वती नदीच असल्याचा निर्वाळा दिला नसला तरी श्रद्धाळूंना मात्र ही गुप्त सरस्वती नदी धरतीवर अवतरल्याचा विश्वास आहे. बुधवारी हजारो श्रद्धाळूंनी इथं येऊन या पवित्र धारेची पूजा केली तसंच त्याला फळ आणि फुलांचा नैवेद्यही वाढला.

ही जलधारा यमुनानगरपासून निघून इतर सहा जिल्ह्यांतून मार्गपरिक्रममा करत वाहणार असल्याचं सांगण्यात येतंय. या योजनेला पुढचा मार्ग देण्यासाठी 20 सदस्यांची समिती नेमली जाईल. यामध्ये, सरस्वती शोध संस्थानाचे अध्यक्षही सहभागी होतील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.