पाक हॅकर्सकडून 'पीसीआय'ची वेबसाईट हॅक, मोदींना केलं टार्गेट

एकीकडे पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरच्या सीमेवर सीजफायरचं उल्लंघन सुरूच आहे तर दुसरीकडे पाकिस्तानी हॅकर्सनं आज ‘प्रेस क्लब ऑफ इंडिया’ची वेबसाईट हॅक केली.

Updated: Oct 9, 2014, 08:38 PM IST
पाक हॅकर्सकडून 'पीसीआय'ची वेबसाईट हॅक, मोदींना केलं टार्गेट title=

नवी दिल्ली : एकीकडे पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरच्या सीमेवर सीजफायरचं उल्लंघन सुरूच आहे तर दुसरीकडे पाकिस्तानी हॅकर्सनं आज ‘प्रेस क्लब ऑफ इंडिया’ची वेबसाईट हॅक केली.

साईट हॅक करून हॅकर्सनं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अश्लील टिप्पणीही केली. मोदींवर निशाणा साधत हॅकर्सनं साईटवर पाकिस्तानचा झेंडा फडकावला. सोबतच ‘स्वतंत्र काश्मीर’साठी संदेशही लिहिला. यानंतर, हॅकर्सनं आपला पुढला निशाणा भारत सरकारची वेबसाईट असल्याचंही म्हटलंय.

सोबतच, प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या साईटवर चेतावणी देत हॅकर्सनं क्रेडिट कार्ड, बँक अकाऊंट आणि सर्वच धोक्यात असल्याचं म्हटलंय. 

काही दिवसांपूर्वी आपली वेबसाईट हॅक झाल्याची कुणकुण प्रेस क्लब ऑफ इंडियाला लागली होती. त्यानंतर त्यांनी ‘पीसीआय’च्या वेबसाईटवर केल्या गेलेल्या कोणत्याही घोषणा अधिकृत घोषणा म्हणून न घेण्याची विनंती केली होती. हॅकर्सकडून अशी घोषणा टाकली जाऊ शकेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला होता.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.