मोदींचा दणका... कामचोर कर्मचाऱ्यांनो सावधान!

बेजबाबदार आणि कामचोर कर्मचाऱ्यांना आता सावध व्हावं लागणार आहे. मोदी सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक अटेन्डेन्स सिस्टम लॉन्च केलंय. 

Updated: Oct 9, 2014, 05:39 PM IST
मोदींचा दणका... कामचोर कर्मचाऱ्यांनो सावधान!   title=

नवी दिल्ली : बेजबाबदार आणि कामचोर कर्मचाऱ्यांना आता सावध व्हावं लागणार आहे. मोदी सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक अटेन्डेन्स सिस्टम लॉन्च केलंय. 

‘अटेन्डेन्स डॉट गव्हर्नमेंट डॉट इन’च्या मदतीनं सराकर आपल्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसोबतच त्यांच्या कामकाजावरही देखरेख ठेऊ शकणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे, ज्या आधारकार्डला लोकसभेपूर्वी मोदींनी निरर्थक ठरवलं होतं त्याच आधारकार्डाशी या अटेन्डेन्स सिस्टमला जोडलं गेलंय. या सिस्टममध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला स्वत:ला या वेबसाईटवर रजिस्टर करणं बंधनकारक असणार आहे. बॅक-अॅडमिनिस्ट्रेशन यासंबंधी सगळ्या डिटेल्सवर लक्ष ठेवणार आहे. 

रजिस्टर केल्यानंतर प्रत्येक संघटनेसाठी एक युनिक डोमेन लागू केलं जाईल आणि तेच वेबसाईटचं पहिलं नाव असेल. बायोमॅट्रीक सिस्टमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडे आधारक्रमांक असणं गरजेचं असणार आहे. कर्मचाऱ्यांची ओळख त्यांच्या आधार नंबरनं होणार आहे. त्यांची उपस्थिती आधार क्रमांकाच्या सुरुवातीच्या 6 अंकांनी संचालित केली जाईल. ‘आयडीएआय’नं व्हेरिफिकेशन केल्यानंतर ही यंत्रणा सक्रीय होईल. नोडल ऑफिसर्सकडे ही यंत्रणा सक्रीय करण्याची जबाबदारी असेल. 

हे बायोमॅट्रिक टर्मिनल केंद्र सरकारच्या अनेक कार्यालयांत लावण्यात आलेत. कर्मचारी कोणत्याही बायोमॅट्रीक टर्मिनलमध्ये आपलं अटेन्डेन्स मार्क करू शकतील. या सिस्टमच्या साहय्यानं रजिस्टर्ड संस्था आणि कर्मचाऱ्यांच्या योग्य संख्येची माहिती मिळू शकेल 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.