खातेदारांचा पॅन नंबर घेणं आता बँकांना बंधनकारक

टॅक्स चोरी करणाऱ्यांच्या गळ्याचा फास आणखी आवळण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे.

Updated: Jan 8, 2017, 07:14 PM IST
खातेदारांचा पॅन नंबर घेणं आता बँकांना बंधनकारक  title=

नवी दिल्ली : टॅक्स चोरी करणाऱ्यांच्या गळ्याचा फास आणखी आवळण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. खातेदारांचा पॅन नंबर किंवा फॉर्म नंबर 60 घेणं बँकांना बंधनकारक करण्यात आलं आहे. 28 फेब्रुवारी 2017च्या आत बँकांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

यासाठी आयकर विभागानं त्यांच्या नियमांमध्येही बदल केले आहेत, तसंच सीबीडीटीनं याबाबतचं नोटिफिकेशनही काढलं आहे. खातेदारकांनीही बँकेत जाऊन पॅन कार्ड नंबर किंवा फॉर्म नंबर 60 भरण्याचा सल्ला या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. झिरो बॅलन्स अकाऊंट म्हणजेच तुमचं सॅलरी अकाऊंट किंवा जनधन योजनेअंतर्गत असलेल्या अकाऊंटसाठी पॅन नंबर देणं बंधनकारक असणार नाही.