'व्हॉटस अॅप' मेसेज 'डिलीट बंदी' अखेर मागे

केंद्र सरकारला अखेर 'नॅशनल एनक्रिप्शन पॉलीसी' रद्द करावी लागली आहे, कारण सरकारच्या 'नॅशनल एनक्रिप्शन पॉलीसी'ला मोठा विरोध होत होता. 

Updated: Sep 22, 2015, 01:24 PM IST
'व्हॉटस अॅप' मेसेज 'डिलीट बंदी' अखेर मागे title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारला अखेर 'नॅशनल एनक्रिप्शन पॉलीसी' रद्द करावी लागली आहे, कारण सरकारच्या 'नॅशनल एनक्रिप्शन पॉलीसी'ला मोठा विरोध होत होता. 

या पॉलीसीनुसार तुम्हाला व्हॉटस अॅप, फेसबुक, ट्वीटर, इंटरनेट बँकिंग, ई-कॉमर्सचे मेसेज ९० दिवसांच्या आत डिलीट करता येणार नव्हते, असं केलं असतं तर तो गुन्हा ठरला असता. मात्र याला जोरदार विरोध झाल्यानंतर सरकारने ही पॉलीसीच गुंडाळून ठेवली आहे.

एनक्रिप्शन म्हणजे काय?
एनक्रिप्शन म्हणजे एखाद्या कुलुपाप्रमाणे काम करतं. ज्यामुळे तुमचा डाटा सुरक्षित राहण्यास मदत होते. जर तुमच्याकडे पासवर्ड असेल तरच तुम्ही एखादी एनक्रिप्टेड फाईल उघडून वाचू शकता. 

पासवर्ड टाकल्यानंतर ही फाईल डिक्रिप्ट होऊन प्लेन टेक्स्टमध्ये बदललं जातं. स्मार्ट कार्ड, सिम कार्ड अशा गोष्टींसाठीही एनक्रिप्शनचा वापर केला जातो. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.