घरात पडलेल्या सोन्यावर 'सुरक्षित' कमाई!

तुमच्या घरात सोनं पडून असेल तर ते सोनं सरकारकडे ठेवून तुम्ही व्याज मिळवू शकता... हे व्याज तुम्ही नगदी स्वरुपात अथवा सोन्याच्या रुपात मिळवू शकता. तसंच आनंदाची बातमी म्हणजे या मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. 

Updated: May 20, 2015, 02:50 PM IST
घरात पडलेल्या सोन्यावर 'सुरक्षित' कमाई! title=

नवी दिल्ली : तुमच्या घरात सोनं पडून असेल तर ते सोनं सरकारकडे ठेवून तुम्ही व्याज मिळवू शकता... हे व्याज तुम्ही नगदी स्वरुपात अथवा सोन्याच्या रुपात मिळवू शकता. तसंच आनंदाची बातमी म्हणजे या मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. 

अनेक घरांमध्ये तसेच विविध धार्मिक किंवा इतर संस्थांकडे पडून असलेलं सोनं व्यवहारात आणण्यासाठी सरकारनं एक अभिनव योजना आखलीय. ही योजना नुकतीच अर्थसंकल्पात मांडण्यात आली गेली.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडील सोनं तुम्ही बॅंकेत ठेवून तुम्ही त्यावर व्याज मिळवू शकता. यासाठी तुम्हाला कमीत कमी ३० ग्रॅम सोनं बँकेत जमा करावं लागणार आहे. 

या योजनेनुसार व्यक्ती अथवा संस्थेला त्यांच्या सोन्याचं बीआयएस हॉलमार्किंग केंद्रावर प्रथम त्याचं मूल्यांकन करावं लागेल. त्यानंतर कमीत कमी एका वर्षासाठी बॅंकेचं 'गोल्ड सेव्हिंग अकाऊंट' तुम्ही उघडू शकतात. 

बॅंका 'गोल्ड सेव्हिंग अकाऊंट' उघडल्यानंतर ३० ते ६० दिवसांनंतर बॅंकेकडून व्याज दिलं जाईल. व्याज दर किती असेल याचा निर्णय बॅंका घेतील.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.