२२ वर्षानंतर अखेर याकूब मेमनला फासावर चढवणार

1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमन याला येत्या 30 जुलै नागपुरात फासावर लटकवण्यात येणार आहे. या प्रकरणातील ही पहिलीच फाशी असेल.

Updated: Jul 15, 2015, 09:11 AM IST
२२ वर्षानंतर अखेर याकूब मेमनला फासावर चढवणार title=

नागपूर : 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमन याला येत्या 30 जुलै नागपुरात फासावर लटकवण्यात येणार आहे. या प्रकरणातील ही पहिलीच फाशी असेल.

53 वर्षाचा याकूब मेमन सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. 30 तारखेला सकाळी 7 वाजता याकूबला फासावर चढवण्यात येईल असं वृत्त 'झी मीडिया'चं सहकारी वृत्तपत्र 'डीएनए'नं म्हटलयं. 

याकूबला टाडा कायद्याच्या कलम 120 ड नुसार 2007 मध्ये याकूबला फाशीची सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यानं उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपतींकडे केलेली सगळ्या अपील फेटाळण्यात आल्यात. या संपूर्ण प्रक्रियेला 22 वर्ष लागलेत. 

मेमनच्या वकीलांनी सर्वोच्च न्यायालयात एक पुर्नविचार याचिका दाखल केलीय. पण सर्वोच्च न्यायालयानं फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे फाशीची शिक्षा निश्चित झाल्याचं सरकारी सूत्रांनी डीएनएशी बोलताना सांगितलयं. 
 
1993 मध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 257 जणांनी आपले प्राण गमावले होते तर 713 जण जखमी झाले होते. 
 
सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याकूबच्या फाशीची तारीख आणि वेळेला अगोदरच मंजुरी दिलीय. कोर्ट आणि नागपूर प्रशासनालाही याची माहिती देण्यात आलीय. याकूबच्या कुटुंबीयांनाही याची माहिती दिली गेलीय. कायद्यानुसार, दोषीला फाशी देण्याअगोदर 15 दिवस त्याच्या कुटुंबीयांना याबद्दल माहिती देणं जरुरी आहे. 
 
या प्रकरणात इतर 10 आरोपींना विशेष टाडा न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती. पण, सुप्रीम कोर्टानं ही शिक्षा जन्मठेपेत बदलली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.