#Top10Criminals मध्ये मोदींचं नाव, रणकंदनानंतर 'गूगल'चा माफीनामा

गूगलमध्ये टॉप १० क्रिमिनल सर्च केल्यास रिझल्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आल्यानंतर सर्च इंजिन गूगलनं बुधवारी रात्री उशिरा त्यांची माफी मागितली. गूगल सर्चवर टॉप १० क्रिमिनल असं इंग्रजीत विचारल्यावर जे फोटो डिस्प्ले होतात, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो दिसतात. यावरुन ट्विटरवर अक्षरशः रणकंदन माजलं आहे आणि #Top10Criminals हा हॅशटॅग ट्रेडिंग होतोय.

Updated: Jun 4, 2015, 09:24 AM IST
#Top10Criminals मध्ये मोदींचं नाव, रणकंदनानंतर 'गूगल'चा माफीनामा title=

नवी दिल्ली : गूगलमध्ये टॉप १० क्रिमिनल सर्च केल्यास रिझल्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आल्यानंतर सर्च इंजिन गूगलनं बुधवारी रात्री उशिरा त्यांची माफी मागितली. गूगल सर्चवर टॉप १० क्रिमिनल असं इंग्रजीत विचारल्यावर जे फोटो डिस्प्ले होतात, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो दिसतात. यावरुन ट्विटरवर अक्षरशः रणकंदन माजलं आहे आणि #Top10Criminals हा हॅशटॅग ट्रेडिंग होतोय.
 
या प्रकरणात गूगलनं आपल्या माफीनाम्यात म्हटलं आहे की, "ही बाब निश्चितच धक्कादायक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारे गूगलचा विचार दिसत नाही. यासाठी आम्ही माफी मागतो. या चुकीवर उपाय शोधण्यासाठी आम्ही एक्स्पर्टची मदत घेतली आहे."

तज्ज्ञांचा अंदाज आहे की, टॅगिंगमुळे सर्च रिझल्टमध्ये असं होऊ शकतं किंवा इंटरनेटवर नरेंद्र मोदींच्या फोटोसह असलेल्या कमेंटमध्ये 'क्रिमिनल'सारख्या शब्दांचा वापर केला असावा. त्यामुळे टॉप १० क्रिमिनलमध्ये मोदींचा फोटो आला असेल, असंही कंपनीनं सांगितलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.