आला रे आला: मान्सून ४८ तासांत केरळमध्ये

नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तविला आहे.

Updated: Jun 4, 2015, 08:46 AM IST
आला रे आला: मान्सून ४८ तासांत केरळमध्ये title=

पुणे : नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तविला आहे.

या आधी मान्सून ३० मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तविला होता. अरबी समुद्रात दाखल झाल्यानंतर मान्सूनच्या मार्गक्रमणात अडथळे निर्माण झाल्यानं तो श्रीलंकेमध्येच खोळंबला होता. मात्र आता आगेकूच करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. 

बुधवारी त्यात आणखी वाढ झाली. अंदमान-निकोबार बेट, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. काल रात्री तब्बल दीड तास केरळमध्ये मुसळधार पाऊस झालाय. आता लवकरच मान्सून मुंबई कोकणात पण दाखल होईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.