खूशखबर ! स्वस्तात करा विमान प्रवास

विमान वाहतूक सेवा कंपनी स्पाइसजेटने उन्हाळी हंगामापूर्वी ग्राहकांना विशेष सवलत जाहीर केली आहे. ५९९ रुपयांपासून विमान तिकीटे देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. ही सवलत नॉन-स्टॉप उड्डाणे करणाऱ्या विमानांच्या एकतर्फी प्रवासासाठी लागू असणार आहेत. 

Updated: Feb 23, 2016, 11:34 PM IST
खूशखबर ! स्वस्तात करा विमान प्रवास title=

मुंबई : विमान वाहतूक सेवा कंपनी स्पाइसजेटने उन्हाळी हंगामापूर्वी ग्राहकांना विशेष सवलत जाहीर केली आहे. ५९९ रुपयांपासून विमान तिकीटे देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. ही सवलत नॉन-स्टॉप उड्डाणे करणाऱ्या विमानांच्या एकतर्फी प्रवासासाठी लागू असणार आहेत. 

आजपासून सुरु झालेली तीन दिवसांची विशेष सवलत योजना 25 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत सुरु होणार आहे. प्रवाशांना 1 मार्च, 2016 ते 13 एप्रिल 2016 दरम्यानच्या प्रवासासाठी तिकीट बूक करता येणार आहे. 

कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करण्याला प्राधान्य देणासाठी ही सवलत उपयोगी ठरेल. तसेच प्रतिकूल हवामान परिस्थितीत प्रवास टाळणाऱ्या प्रवाशांसाठीदेखील मार्च एप्रिलचा वसंत ऋतू अनुकूल ठरेल, असे स्पाइसजेटच्या व्यावसायिक विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष शिल्पा भाटिया यांनी म्हटलं आहे.