गुड न्यूज, धावत्या ट्रेनमध्येही टीसीकडून मिळणार तिकीट

ऐन समर व्हॅकेशनमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज आहे. धावत्या ट्रेनमध्येही टीसीकडून तिकीट खरेदी करता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला तिकीट मिळाले नाही तरीही विनातिकीट प्रवास करण्याची चिंता मिटणार.

Updated: May 19, 2015, 10:11 PM IST
गुड न्यूज, धावत्या ट्रेनमध्येही टीसीकडून मिळणार तिकीट title=

नवी दिल्ली : ऐन समर व्हॅकेशनमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज आहे. धावत्या ट्रेनमध्येही टीसीकडून तिकीट खरेदी करता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला तिकीट मिळाले नाही तरीही विनातिकीट प्रवास करण्याची चिंता मिटणार.

रेल्वे प्रवाशांना आता ट्रेनमध्येच तिकीट मिळणार आहे. धावत्या ट्रेनमध्ये टीसीकडून प्रवाशांना तिकीट खरेदी करता येणार आहे. त्यामुळं विनातिकीट प्रवास केल्यास दंड भरण्याची चिंता प्रवाशांना नाही. कारण तुम्ही ट्रेनमध्ये चढल्यानंतरही आता तिकीट खरेदी करु शकाल. त्यासाठी ट्रेनमधल्या टीसीला तुम्हाला भेटावं लागेल.

या टीसीकडून रिकामा बर्थ माहिती घेऊन तुम्हाला तिकीट मिळेल. त्यासाठी तिकीटापेक्षा दहा रुपये जादा मोजून हे तिकीट उपलब्ध करुन दिलं जाईल.सध्या सुपरफास्ट ट्रेनमध्ये ही सुविधा सुरु करण्यात आलीय. ही सुविधा सध्या उत्तर भारतात काही ठरावीक गाड्यांमध्ये सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर अन्य ठिकाणी सुरु होणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.