कोल्लम : अनेक वर्षांपासून लैंगिक शोषण करणा-या साधूंचं एका २३ वर्षीय तरुणीने गुप्तांग कापून टाकल्याची घटना केरळमध्ये शुक्रवारी घडली आहे. श्रीहरी उर्फ गणेशानंद स्वामी पीडित तरुणीवर शाळेत असल्यापासून बलात्कार करत होता. या भयाण परिस्थितीतून आपली सुटका करुन घेण्यासाठी तरुणीने अखेर बलात्कार करणा-या त्या साधूचं गुप्तांगच कापून टाकलं आहे.
तरुणीने स्वत: या घटनेनंतर पोलिसांना फोन याची माहिती दिली. स्वसंरक्षणासाठी हे पाऊल उचलल्याची कबुली तिने पोलिसांकडे दिली आहे. पीडित तरुणीचे पालक या स्वामीचे भक्त होते. कोल्लम येथील एका आश्रमात हा साधू राहत होता. आरोपी स्वामीची परिस्थिती सध्या नाजूक आहे. मेडिकल कॉलेज रुग्णालयात साधूला दाखल करण्यात आलं आहे.
साधूबाबत ही गोष्ट सांगितली असती तर कोणीच माझावर विश्वास ठेवला नसता. त्यामुळे मी हे पाऊललं असं तरुणीने म्हटलं आहे.