अहमदाबाद : गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात, पाकिस्तानचे गझल गायक गुलाम अली यांचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला. हा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणांमुळे रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार, अली यांना कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी 'हनुमंत पुरस्कारा'नेही गौरविण्यात येणार होते. परंतु, ते अखेरच्या दिवशीही उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
सुप्रसिद्ध धार्मिक व्यक्तिमत्त्व असलेल्या मोरारजी बापु यांच्या नेतृत्वाखालील एका संस्थेने भावनगर जिल्ह्यामधील एका गावामध्ये 'अस्मिता पर्व' या 4 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
'अस्मिता पर्व'मध्ये गुलाम अली यांच्या गायनाचा कार्यक्रम आज होणार होता. परंतु, काही अपरिहार्य कारणांमुळे या कार्यक्रमास उपस्थित राहु शकत नसल्याचे त्यांनी कळविले असल्याचं माहिती आयोजकांनी आज दिली.