ओला, उबेरच्या १८ टॅक्सी जप्त

दिल्ली सरकारने ऑनलाईन बुकिंगने टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या प्रमुख कंपन्या ओला आणि उबेर यांच्या १८ टॅक्सी जप्त केल्या आहेत. दिल्लीत सम-विषम वाहतूक योजना लागू आहे. या दरम्यान ग्राहकांकडून प्रवासाचे अतिरिक्त शुल्क आकारल्यामुळे सरकारने ही जप्ती आणली आहे.

Updated: Apr 20, 2016, 12:14 AM IST
ओला, उबेरच्या १८ टॅक्सी जप्त title=

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने ऑनलाईन बुकिंगने टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या प्रमुख कंपन्या ओला आणि उबेर यांच्या १८ टॅक्सी जप्त केल्या आहेत. दिल्लीत सम-विषम वाहतूक योजना लागू आहे. या दरम्यान ग्राहकांकडून प्रवासाचे अतिरिक्त शुल्क आकारल्यामुळे सरकारने ही जप्ती आणली आहे.

दिल्लीमध्ये सध्या १५ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान दुसऱ्या टप्प्यात सम-विषम वाहतूक योजना राबविण्यात येत आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी दिल्लीतील आप सरकार प्रयत्नशील आहे. 

'अतिरिक्त शुल्क आकारणीसंदर्भात ग्राहकांकडून वारंवार आलेल्या तक्रारींमुळे, आम्ही या कंपन्यांच्या टॅक्सी जप्त केल्या आहेत. त्यापैकी बहुतांश टॅक्सी या उबेरच्या आहेत,' अशी माहिती दिल्ली येथील सरकारी अधिकाऱ्याने दिली.

भाजपचे खासदार विजय गोयल यांनी काल सम-विषम वाहतुकीचा नियम मोडल्याबद्दल त्यांची गाडी अडवली दिल्ली पोलिसांनी अडवली. पोलिसांनी त्यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांना नियम पाळण्याचे आवाहन केले. त्यानंतर आता जादा शुल्क आकारल्याबद्दल टॅक्सी सेवा देणाऱ्या या २ प्रमुख कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.