आता, मराठीतून मिळवा तुमच्या 'पीएफ'ची माहिती!

तुमच्या पीएफ अकाऊंटची माहिती आता तुमच्या मोबाईलवर आणि तेही तुमच्या मातृभाषेत उपलब्ध होतेय. 

Updated: Apr 2, 2015, 12:39 PM IST
आता, मराठीतून मिळवा तुमच्या 'पीएफ'ची माहिती! title=

मुंबई : तुमच्या पीएफ अकाऊंटची माहिती आता तुमच्या मोबाईलवर आणि तेही तुमच्या मातृभाषेत उपलब्ध होतेय. 

ईपीएफओ अर्थात भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून आपल्या पसंतीची भाषा निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. यामध्ये, मराठी भाषेचाही समावेश आहे. 

'ईपीएफओ' ऑनलाईन सेवेचा भाग असलेली ही सुविधा ज्या नागरिकांनी आपलं 'युनिव्हर्सल अकाऊंट' अॅक्टिव्हेट केलं असेल त्यांनाच प्राप्त होईल. 

तुमचा UAN नंबर मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

या अगोदर ईपीएफओच्या वेबसाईटवर केवळ इंग्रजी आणि हिंदीतूनच माहिती मिळत होती. ती आता इतर १० भाषेतही उपलब्ध होणार आहे. 

कशी सुरू कराल ही सुविधा आपल्या भाषेतून...

  • यासाठी, तुम्हाला युनिव्हर्सल नंबर अॅक्टिव्ह करताना रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवरून तुम्हाला एक एसएमएस पाठवायचाय.

  • मॅसेजमध्ये EPFOHO UAN असं टाईप करा

  • त्यानंतर स्पेस देऊन आपल्या पसंतीच्या भाषेची पहिली तीन अक्षरं टाईप करा... मराठीसाठी MAR (EPFOHO UAN MAR) लिहा.

  • आणि हा मॅसेज पाठवा ७७३८२९९८९९  या क्रमांकावर

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.